सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
*चालू घडामोडी दिनांक17 मार्च 2022
*इतिहासात पाहताना:
जन्म:१९२०-बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष शेख मुजबिर रहीम
मृत्यू:१८८२-आधुनिक मराठी ग्रंथकार विष्णुशास्त्री चिपळूणकर
१.सशस्त्र दलासाठी वन रँक वन पेन्शन, बाबत केंद्र सरकारने धोरणांत्मक निर्णय घेतला आहे राज्यघटनेतील तरतुदींनुसार वैध निर्णय आहे असा निकाल वन रँक व पेन्शन बाबत दाखल याचिकेवर निर्णय दिला आहे.
२.रशिया युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रशियात होणारी 44 वि ओलिम्पिय्यड बुद्धिबळ स्पर्धा भारतामध्ये चेन्नई येथे जून-ऑगस्ट या दरम्यान होणार आहे.
३.70 वि मिस वर्ल्ड ही स्पर्धा नुकतीच घेण्यात आली कोरोनामुळे 2020 मध्ये होणारी ही स्पर्धा 2022 मध्ये घेण्यात आली .मिस वर्ल्ड 2021 ची पोलंडची कॅरोलिना बिलस्क्वा ही विजेती व अमेरिकेची श्री सैनी ही उपविजेता ठरली .श्री सैनी ही मूळ भारतातील लुधियाना (पंजाब)येथील आहे.
४.श्रीलंकेचे अर्थमंत्री बासील राजपक्षे यांनी अर्थमंत्री निर्मळ सीतारामन व परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांची दिल्लीमध्ये भेट घेतली.ढासळत्या श्रीलंकन अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी साहाय्य म्हणून भरताद्वारे 1 अब्ज डॉलर्स चे कर्ज देण्यात आले आहेत .श्रीलंकन सरकार व sbi यांच्यात करार करण्यात आला आहे.
५.नेदरलँड येथील हेग येथे असणाऱ्या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये रशिया विरोधात युक्रेनने याचिका दाखल केली होती.याचा निकाल युक्रेनच्या बाजूने लागला आहे.आंतरराष्ट्रीय न्यायालयाने रशियाला त्वरित लष्करी कारवाई थांबवण्याचे आदेश दिले आहेत.तसेच आपल्या सीमेमध्ये वापस जावे असे देखील म्हटले आहे याचसोबत युक्रेनने रशियाला ज्या पद्धतीने टक्कर देऊन झुंजवत ठेवले
त्याबद्दल युक्रेनचे कौतुक केले आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार रशियाला आंतरराष्ट्रीय कोर्टाचा आदेश मानवा लागेल.
६.रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम सर्वच देशांच्या अर्थव्यवस्था वर होत आहे.इंटरनॅशनल रेटिंग एजन्सी असणाऱ्या मुडीज इन्व्हेस्टर्स सर्विसने 2022 -23 या वर्षासाठी भारताचा विकास दर 9.5टक्क्यांवरून 9.1टक्क्यांवर येईल असा अंदाज व्यक्त केला आहे.
Comments
Post a Comment