सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
चालू घडामोडी दिनांक १५ मार्च २०२२
**इतिहासात घडलेल्या महत्वपूर्ण घटना थोडक्यात -
आज १५ मार्च आज जागतिक ग्राहक दिन ग्राहकांमध्ये त्याच्या खरेदीच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण व्हावी तसेच आपल्या हक्कांबाबत तो सक्षम व्हावा याकरिता अंतरराष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येतो .
आज जागतिक दिव्यांग दिन देखील आहे .
१८३१ :मराठीतील पहिल्या पंचांगाची छपाई करण्यात आली .
*मृत्यु :प्रसिद्ध मराठी नाट्य अभिनेते ,गायक,वादक व्यंकटेश पेंढारकर उर्फ बापू पेंढारकर
१.राज्यामध्ये तलाठ्यांच्या रिक्त असणार्या जागांमुळे महसूल यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात तन निर्माण होत आहे याच पार्श्वभूमीवर राज्यातील ३१६५ तलाठ्यांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत .लवकरच त्यातील १ हजार रिक्त जागा करिता भरती प्रक्रिया राबवण्यात येईल अशी घोषणा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली .
२. एअर इंडिया या हवाई वाहतूक कंपनीच्या अध्यक्षपदी tata sons चे अध्यक्ष एन.चंद्रा यांची निवड करण्यात आली आहे .
3.२०१७ पासून झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये व दहशतवादी विओधी मोहिमेत आतापर्यंत १५६ जवान शहीद झाल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी संसदेत दिली .
४.देशामधील १२ ते १४ या वायोगाताम्धील मुलांचे कोरोन लसीकरण १६ मार्च पासून सुरु करण्यात येणार असल्याची केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी घोषणा केली .
५.भारतीय उद्योग महासंघ CII च्या पश्चिम विभागाच्या अध्यक्षपदी २०२२-२३ या वर्षासाठी राजरत्न ग्लोबल वायर लिमिटेडचे अध्यक्ष सुनील चोरडिया यांची निवड केली गेली .
६.फेब्रुवारी महिन्यामध्ये किरकोळ महागाई दर ६.०७ टक्के इतका नोंदवण्यात आला रिझर्व बँकेच्या सहनशील पातळीच्या पुढे हा निर्देशांक नोंदवण्यात आला आहे .
७.कर्नाटक मधील गाजलेल्या हिजाब प्रकरणावर निर्णय देताना कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक ठिकाणी , संस्थांमध्ये हिजाब आवश्यक नसल्याचा निर्णय दिला आहे.
८.पंजाब राज्यातील कोरोनाचे सर्व प्रकारचे निर्बंध हटवण्याचे निर्णय घेतला आहे .कोरोनाच्या रुग्ण सख्या आटोक्यात असल्याच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे .
Comments
Post a Comment