सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
चालू घडामोडी ०५एप्रिल 2022
1.राज्यामध्ये विविध जिल्ह्यात कार्यरत असलेल्या 14 कौटुंबिक न्यायालय (family court)त्याच ठिकाणी कायमस्वरूपी मान्यता देण्यात आली आहे.गेल्या 5 वर्षांपासून या ठिकाणी ही कोर्ट कार्यरत होते.
2.कोरून साथरोगाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सलग दोन वर्षे लागू करण्यात आलेले अर्थसंकल्पीय निधीच्या खर्चावरील निर्बंध रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला आहे.
3.लस उत्पादन प्रक्रियेमध्ये आढळलेल्या त्रुटीमुळे भारत बायोटेक कंपनी ची निर्मिती असलेल्या कोव्याकसीन या लशीचा पुरवठा थांबवण्याचा निर्णय कागतिक आरोग्य संघटनेने घेतला आहे.
4.ऑनलाइन विक्रीसह औषधे हक्क,वैद्यकीय उपकरणांच्या विक्रीचे हक्क,औषध चाचणी घेणाऱ्या नागरिकांचे हक्क आशा विविध हक्कांचा समावेश असलेल्या नव्या सौंदर्य प्रसाधन व औषधे विक्री कायद्याची निर्मिती प्रक्रिया सुरू झाली आहे.
5.देशामधील गृह व वित्त विभागातील सर्वात मोठी कंपनी एचडीएफसी लिमिटेड व खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी अग्रणी बँक असणाऱ्या एचडीएफसी बँक यांच्या विलीनीकर्णाची घोषणा एचडीएफसी समूहाद्वारे करण्यात आली.
6.भारताचे नेपाळमधील राजदूत विनय मोहन क्वात्रा यांची देशाचे नवे परराष्ट्र सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली.
7.स्पेनचा टेनिसपटू कार्लोस अल्कराजने मियामी खुल्या पुरुष एकेरी टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले .
8.भारतीय अमेरिकन गायिका फाल्गुनी शाह याना महत्वाचा समजला जाणारा ग्र्यामी पुरस्कार मिळवला.मुलांसाठी उत्कृष्ट संगीत अलबम या श्रेणीमध्ये अ कलरफुल वर्ल्ड या अलबमसाठी हा पुरकसार त्यांना मिळाला.
9.पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांचे सरकार सहकारी पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे अल्प मतात आले होते.इम्रान खान यांनी संसद बरखास्त केल्यामुळे आता इम्रान खान काळजीवाहू पंतप्रधान ठरले आहेत.तर पाकिस्तानमध्ये आता मध्यावधी निवडणुका लागू शकतात.
10.शेजारील राष्ट्र असणाऱ्या श्रीलंकेची आर्थिक स्थिती अत्यंत खालावली आहे.अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे.श्रीलंकेमध्ये सरकार विरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे.वाढलेल्या महागाई मुळे जनता त्रस्त आहे.श्रीलंकेमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment