सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
लष्कर मेळावा 2022 साठी तयारी करणाऱ्या व पहिल्यांदाच मेळाव्यात सहभागी होणाऱ्या तरुणांसाठी काही महत्वाच्या सूचना!
१.मेळाव्यात सामील होण्यासाठी तुमच्या कडे ऑनलाइन रित्या अर्ज केलेली प्रिंट आवश्यक आहे.तसेच जे प्रवेशपत्र भारतीय सैन्याद्वारे जारी करण्यात आले असेल त्याची प्रत.
2.आपल्या टीसी (शाळा सोडल्याचा दाखला,आधार कार्ड,10 वि चे मार्कशीट,सनद ,(12 वीचे सनद मार्कशीट असल्यास )पासपोर्ट साईज फोटो साधारण 20-30 प्रति,जातीचे प्रमाणपत्र, कास्ट व्यलिडीटी प्रमाणपत्र ,नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट या सर्वांच्या दोन दोन कमीत कमी प्रति काढून ठेवाव्यात .
3.आपले ओरिजिनल आधार कार्ड,10 वि चे मार्कशीट,सनद ,(12 वीचे सनद मार्कशीट असल्यास )जातीचे प्रमाणपत्र, कास्ट व्यलिडीटी प्रमाणपत्र ,नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट सोबत ठेवावे .
4.सर्वात महत्वाची गोष्ट अशी की मेळाव्याला जाताना सोबत नोटरी नेलेली असणे आवश्यक आहे.उमेदवारांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद नाही याबद्दलचे स्वतः चे डिक्लेरेषण यामध्ये असते .नोटरी तुम्हाला नोटरी वकिलांद्वारे करून मिळेल नोट्री साठी आवश्यक फॉरमॅट pdf खाली देण्यात आली आहे.
5.मेळाव्याला वेळेच्या काही वेळ अगोदरच उपस्थित रहावे आपली प्रवेशाची विशिष्ट वेळ हॉल तिकीट वर नमूद केलेली असेल .
6.मेळाव्यात प्रवेश केल्यावर देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे सैन्याची कडक शिस्त कशी असते त्याचा प्रत्यय तुम्हाला येईल.
7.आपल्यासोबत 1-2 पेन ,एक फेविकोल स्टीक ,एखादा हाताखाली धरण्याकर्ता पॅड असावा.कामी येईल.
8.मेळाव्यात प्रवेश करण्यापूर्वी तुमच्याकडील मोबाईलची चेकिंग केली जाईल.रॅली मध्ये मोबाईल अलाऊड नसतो.
9.आपल्या अनुभवी मित्र मंडळींकडून सैन्य भरतीविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्या अनुभव कामी येईल.घड्याळ वगैरे वस्तू देखील अलाऊड नसतात.
तर मित्रानो ही होती काही महत्वपुर्ण माहिती मेळाव्यासाठी सर्व मित्रांना ऑल द बेस्ट!
Comments
Post a Comment