सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
चालू घडामोडी दिनांक १६ सप्टेंबर २०२२
१.आज १६ सप्टेंबर .१६ सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिन म्हणून पाळण्यात येतो.ओझोन वायुच महत्व सर्वाना समजाव हा या दिवस साजरा करण्या मागील उद्देश आहे .ओझोन हा वायू पृथ्वीच्या वातावरणाचे रक्षण करतो .सूर्यापासून निघणारनाऱ्या अतिनील किरणांपासून पृथ्वीचे तो रक्षण करतो .
२.कृषी हा विषय महाराष्ट्रातील शाळामध्ये इयत्ता ५ विपासून १२ वी च्या वर्गांमध्ये शिकवला जाईल अशी घोषणा राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज केली .
3.केंद्र व आसाम सरकारने गुरुवारी आसाममधील ८ सशस्त्र आदिवासी गटांना मुख्य आणण्यासाठी त्रिपक्षीय करार केला आहे .या करारांमुळे ईशान्येकडील राज्यांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यास मदत मिळेल .हा देशाचे गृहमंत्री अमित शहा व आसामचे मुख्यमंत्री सरमा यांच्या उपस्थितीमध्ये झाला .त्या ८ आदिवासी गटांची नवे खालीलप्रमाणे
१.बिरसा कमांडो फोर्स (BCF)
२.आदिवासी पीपल्स आर्मी (APA)
3.ऑल आदिवासी न्याष्णाल लिबरेशन आर्मी (AANLA )
४.आदिवासी कोब्रा मिलिटरी ऑफ आसाम (ACMA)
५.संथाली टायगर फोर्स (STF)
६ उर्वरित तीन गट हे BCF ,AANLAआणि ACMA चे उपगट आहेत .
४.SCO समिट २०२२ (शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषद ) मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले .ही शिखर परिषद उजबेकिस्तान मध्ये आयोजित केली गेली आहे .१५ ते १६ सप्टेंबर दरम्यान ही परिषद पार पडणार आहे .
५.टेनिसपटू रॉजर फेडरर ने स्पर्धात्मक टेनिस मधून निवृत्तीची घोषणा जाहीर केली .
६फोर्ब्स रिअल टाईम ने जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश लोकांची यादी जाहीर केली त्यानुसार अमेझोन च्या जेफ बेझोस यांना मागे टाकत अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी तिसऱ्या क्रमांकावर आहे तर टेसला चे संस्थापक एलोन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले .या यादीमध्ये पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवणारे ते पहिल्के आशिआइ व्यक्ती आहे.
७.समरकंद येथे सुरु असलेल्या SCO शिखर परिषदेत बोलताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी युरोपातील बन्द्रन्म्ध्ये अडकलेले ३००००० टन पेक्षा अधिकचे रशियन खत विकसनशील देशांना मोफत देण्यास रशिया तयार असल्याचे म्हटले .
८.अमेरिकेच्या व्हाईट हौसने युक्रेंसाठी ६०० दशलक्ष डॉलर नवीन लष्करी मदतीची घोषणा केली आहे .
९.आज झालेल्या शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन च्या शिखर परिषदे मध्ये परिषदेला संबोधित करताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खालील काही महत्वपूर्ण मुद्यांना हात घातला
१.मोदी म्हणाले कि SCO चि भूमिका अत्यंत महत्वाची आहे कारण संपूर्ण जगणे कोरोन महामारी नंतर आर्थिक उभारीचे आव्हान पेलले आहे .SCO चे सदस्य देश जागतिक जीडीपी मध्ये ३० टक्के योगदान देतात .जगातील ४० टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या या देशांमध्ये वास्तव्यास आहे .भारत sco मधील परस्पर सहकार्याचे व विश्वासाचे समर्थन करतो .
२.युक्रेन्मधल्या युद्ध संकट व साथीच्या महामारीच्या संकटामुळे जगभरात उर्जा व अन्न संकट निर्माण झाले आहे .sco ने आमच्या प्रदेशात विश्वासपूर्ण ,लवचिक,वैविध्तापूर्ण पुरवठा साखळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे .
3.भारत स्वतः ला उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दिशेने प्रगती करत आहे .भारतात ७०००० हून जास्त स्टार्ट अप्स आहेत ज्यात १०० पेक्षा जास्त युनिकोर्ण आहेत.
४.भारत स्टार्ट अप आणि इनोवेश्न्वर नवीन कार्य गट स्थापन करून SCO च्या देशांसोबत अनुभव सामायिक करण्यास तयार .
५.यावर्षी भारताची अर्थव्यवस्था ७.५ टक्के दराने वाढण्याची अपेक्षा .
६अन्न टंचाई च्या मुद्द्यावर बोलताना अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे या समस्येवर एक संभाव्य उपाय म्हणून बाजरीच्या लागवडीला व वापरला चालना देणे .बाजरी एक सुपर फूड आहे हजारो वर्षांपासून जगाच्या अनेक भागांमध्ये पिकवले जाते पौष्टीक्तेसह अन्न संकटासाठी कमी किमतीचा पर्याय आहे .
७.२०२३ हे वर्ष United Nation द्वारे आंतरराष्ट्रीय बाजरीचे वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे .
![]() |
| Millets |
८.SCO अंतर्गत 'Millet Food Festival 'आयोजित करण्यात यावे असा विचार मोदींनी बोलून दाखवला .
९.भारत हा वैद्यकीय आणि निरोगी पर्यटनासाठी जगातील सर्वात स्वस्त ठिकाणांपैकी एक असल्याचे सांगताना मोदी म्हणाले कि ,'WHO ग्लोबल सेंटर फॉर ट्रेडीशनल मेदिसिंचे पहिले व एकमेव असे ठिकाण एप्रिल २०२२ मध्ये गुजरातमध्ये उद्घाटन करण्यात आले SCO देशांमधील पारंपारिक औषधांबाबत सहकार्य वाढवले पाहिजे.यासाठी भारत पारंपारिक औषधांवरील नवीन SCO वर्किंग ग्रुपसाठी भारत पुढाकार घेईल असे मोडी म्हणाले '.
Comments
Post a Comment