सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
भारतातील पालकांसाठी महत्वाची माहिती!लहान मुलांना कफ सिरप (खोकल्यावर चे औषध )देत असताल तर सावधानी बाळगा.कारण भारतातील एका फार्मसीयूटिकल कम्पणीच्या कफ सिरप,सर्दी वरची औषधे वापरू नका असे आवाहन जागतिक आरोग्य संघटना अर्थात (WHO )ने केले आहे .पश्चिम आफ्रिकेमधील ग्यामबिया मध्ये या औषधाच्या वापरामुळे मूत्रपिंड त्रास होऊन 66 बालकांचा मृत्यू झाला आहे.
WHO ने तपासल्या 23 नमुन्यांपैकी 4 नमुने हे डायथेलीन ग्लायकोल किंवा इथिलीन ग्लायकोल दूषित असल्याचे आढळले.डायथेलीन ग्लायकोल आणि इथेलीन ग्लायकोलमुळे विषारी परिणाम होऊ शकतात.ज्यात पोटदुखी, उलट्या,अतिसार,तीव्र डोकेदुखी, मूत्रपिंड त्रास यामुळे मृत्यू होऊ शकतो.
WHO ने इशाऱ्या मध्ये सांगितलेल्या नित्कृष्ठ उत्पादनाचा वापर केल्यामुळे त्याचा लहान मुलांवर गंभीर परिणाम व प्रसंगी मृत्यू देखील होऊ शकतो असे म्हटले आहे.ती उत्पादने खालीलप्रमाणे-
प्रोमेथाझिन ओरल सोल्यूशन,कॅफेकसमालिन बेबी कफ सिरप,मेकॉफ बेबी कफ सिरप,म्याग्रीप अँड कोल्ड सिरप या औषधांचा समावेश आहे.
भारतात 2020 मध्ये जम्मू व काश्मीर मध्ये डायथेलीन ग्लायकोल ने दूषित असलेल्या दुसऱ्या ब्रँडच्या कफ सिरपच्या सेवनामुळे 17 मुलांचा मृत्यू झाला होता.
Comments
Post a Comment