सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
भाग 3 मुलभूत हक्क
मूलभूत हक्क दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो,भारतीय संविधानानुसार मुलभूत हक्क किती आहेत,समतेचा अधिकार कोणत्या कलमात नमुद केला आहे ?,भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य,मूलभूत अधिकार कलम,मूलभूत हक्कांमध्ये आर्थिक हक्कांचा समावेश होत नाही,भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकाराचे संरक्षण कोण आहे,nokarisankalp.blogspot.com,मुलभूत हक्क ,नोकरी संकल्प .
मूलभूत हक्क क्र.२स्वातंत्र्याचा हक्क
नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा नोकरी संकल्पच्या संविधान "लोकशाहीचा आधारस्तंभ"या भागामध्ये. जस की आपण जाणता की या लेखाद्वारे ,भागाद्वारे आपण भारतीय संविधान कसे बनले आहे त्याची रचना कशी आहे तसेच त्यामध्ये नमूद गोष्टींची संपूर्ण माहिती आपण गेले काही दिवसांपासून घेत आहोत.मागील भागामध्ये आपण मूलभूत हक्कांविषयी महिती जाणून घेत होतो.त्यामध्ये आपण मूलभूत हक्क क्र.१.समानतेचा हक्क याविषयी माहिती जाणून घेतली .आजच्या आपल्या या भागामध्ये आपण क्र.२च्या स्वतंत्र्याचा हक्क या मूलभूत हक्काविषयी जाणून घेणार आहोत.
मूलभूत हक्क क्र.२स्वातंत्र्याचा हक्क
अनुच्छेद १९:भाषणस्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या विवक्षित हक्कांचे संरक्षण:
(क)सर्व नागरिकास भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा
(ख)शांततेने विनाशस्त्र एकत्र जमण्याचा
(ग)अधिसंघ वा संघ (किंवा सहकारी संस्था बनविण्याचा)
(घ)भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र संचार करण्याचा
(ड)भारताच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भगत राहण्याचा व स्थानिक होण्याचा.
(छ)कोणताही पेशा आचरण्याचा अथवा व्यवसाय ,व्यापार ,धंदा चालवण्याचा हक्क असेल.
स्पष्टीकरण:
वरील स्वतंत्र्याचा हक्क यामध्ये समाविष्ट असणारे हक्काचे विविध प्रकार दिले आहेत.मात्र जरी संविधानात या तरतुदी भारतीय नागरिकाला स्वातंत्र्य देत असले तरी जर संविधानाने दिलेल्या या स्वातंत्र्याचा गैरवापर करून देशास नुकसान होत आहे असे सरकारला वाटत असेल तर या स्वातंत्र्यवर निर्बंध लाधण्यासाठी आवश्यक कायदे करण्याची मुभा संविधानाने सरकारला दिलेली आहे.या बाबतीत संविधानाने नमूद केलेले मुद्दे आपण पाहुयात-
(२)खंड १चा उपखंड क यामधील कोणत्याही गोष्टीमुळे उक्त उपखंडाने प्रदान केलेल्या हक्काच्या वापरावर ज्या कायद्याद्वारे भारताची सर्वभौमता व अखंडता,संप्रभुता,सुरक्षा,परकीय देशांशी मैत्रीचे संबंध,सार्वजनिक सुव्यवस्था ,नीतिमत्ता याच्या हितासाठी किंवा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान ,अब्रुनुकसान,चेतावणी ,अपराध यासंबंधी जेथवर वाजवी निर्बंध घातले असतील तेथवर आशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही असा कायदा करण्यास राज्याला परतोबांध होणार नाही.
अनुच्छेद:२०अपराधानबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण :
(१)जे कृत्य अपराध असल्याचा दोषारोप करण्यात आला असेल ते कृत्य एखाद्या व्यक्तीने करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याच्या त्यामुळे भंग झाल्याखेरीज आशा कोणत्याही अपराधाबद्दल ती व्यक्ती दोषी ठरवली जाणार नाही .
अनुच्छेद २१:जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण :
कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही .
अनुच्छेद २१क:शिक्षणाचा हक्क:६ते १४वयोवर्षं मधील सर्व बालकांसाठी राज्यास कायद्याद्वारे निर्धारित करता येईल अशा रीतीने मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करील.
अनुच्छेद२२:विवक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण:
(१)अटक झालेल्या कोणत्याही व्यक्तीस आशा अटकेची कटने शक्य तितक्या लवकर तिला कळविल्याशिवाय हवालातीत स्थानबद्ध करता येणार नाही किंवा आपल्या पसंतीच्या विधी व्यवसायीचा (वकिलाचा)विचार घेण्याचा व तिच्या करवी बचाव करण्याचा हक्क तिला नाकारला जाणार नाही.
(२)ज्या व्यक्तीला अटक केली आहे जिला हवालातीत स्थानबद्ध केले आहे आशा प्रत्येक व्यक्तीला तिच्या अटकेच्या ठिकाणापासून जवळ असणाऱ्या न्यायदंडाधिक्कार्याच्या कार्यालयात त्या व्यक्तीला २४तासांच्या आतमध्ये हजर केले जाईल.न्याय दंडाधिकार्याने प्राधिकृत केल्याशिवाय त्या व्यक्तीला पुढील काळासाठी अटकेमध्ये ठेवता येणार नाही
*स्पष्टीकरण:म्हणजेच काय तर अनुच्छेद 22 नुसार कोणत्याही व्यक्तीस अटक झाल्यास कायद्यानुसार तिला वकिलाचा सल्ला घेण्यापासून रोखता येणार नाही व अटकेचे कारण स्पष्ट करावे लागेल, तिला २४तासांच्या आतमध्ये न्याय दंडाधिकारी यांच्या पुढे हजर करावे लागेल.२४तासांपेक्षा अधिक काळ तिला अटकेत ठेवता येणार नाही.मात्र याला अपवाद असा की जर ती व्यक्ती देशद्रोही कृत्यात सामील असल्याचे आढळले असेल,तर वरील नियम याला अपवाद ठरू शकतात.
Comments
Post a Comment