सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
हे राज्य बनणार वैद्यकीय शिक्षण हिंदीतून देणारे पाहिले राज्य!
मध्यप्रदेश राज्य हे हिंदी भाषेतून वैद्यकीय शिक्षण देणारे भारतातील पहिले राज्य बनणार आहे.आज भोपाळ येथे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते वैद्यकीय शिक्षणाच्या हिंदी अभ्यासक्रमाला सुरुवात होणार आहे.देशाचे गृहमंत्री अमित शहा हे मध्य प्रदेश दौऱ्यावर आहेत या दरम्यान ते या योजनेचा शुभारंभ करणार आहेत.
वैद्यकीय शिक्षण देशाची राष्ट्रीय भाषा असणाऱ्या हिंदी मधून देण्याची ही मध्य प्रदेश सरकारची महत्वपूर्ण योजना आहे.वैद्यकीय शिक्षनाच्या हिंदी भाषेतील अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकाचे अनावरण शहा यांच्या हस्ते केले जाणार आहे.हा कार्यक्रम लाल परेड मैदान येथे 12 वाजल्यापासून सुरू होईल.
वैद्यकीय शिक्षणाच्या इंग्रजी भाषेतील पुस्तकांचे हिंदीमध्ये भाषांतर:
या योजने अंतर्गत वैद्यकीय शिक्षणाच्या इंग्रजी भाषेतील पुस्तकांचे हिंदी भाषेमध्ये भाषांतर करण्यात आले.सुरुवातीला अभ्यासक्रमाच्या 3 पुस्तकांचे भाषांतर करण्यात आले आहे.97 डॉक्टरांच्या 4टीमने रात्रंदिवस प्रयत्न करून वैद्यकीय शिक्षणाच्या इंग्रजी पुस्तकांचे हिंदी भाषांमध्ये भाषांतर केले अशी माहिती मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी दिली .
Comments
Post a Comment