नमस्कार नोकरी संकल्प मध्ये आपले स्वागत आहे .मित्रानो आपला भारत देशाचा मुल गाभा म्हणजे आपली लोकशाही .जगातली एक समृद्ध लोकशाही लाभलेला देश म्हणून आपल्या देशाकडे पहिले जाते .भारत हा विविधतेने नटलेला देश आहे .विवीध धर्म ,पंथ ,जातींचे लोक भारतामध्ये एकत्र नांदत आहेत .आपल्या लोकशाहीचा मुल गाभा म्हणजे आपले संविधान .भारताची संपूर्ण राज्य्व्यवस्था ही संविधानावर आधारित आहे .विविध कायदे ,कलम यांचा त्यामध्ये समावेश आहे .प्रत्येक भारतीयाला आपल्या संविधान व त्यामध्ये असणाऱ्या तरतुदींविषयी माहिती असायला हवी .हाच उद्देश्य ठेवून नोकरी संकल्प तुमच्यासाठी दररोज संविधानामधील तरतुदींची माहिती देणारी संविधान 'लोकशाहीचा आधारस्तंभ' या लेखा अंतर्गत ही माहिती देण्यात येणार आहे .चला तर मग अधिक वेळ न दवडता माहिती जाणून घेऊयात संविधानाविषयी !
*सुरुवात संविधानाच्या उद्देशिका /प्रस्तावनेपासून :
भारतीय संविधानानुसार संपूर्ण देशामध्ये न्यायव्यवस्था कार्य करते .या आपल्या भारताच्या संविधनाचा सुरुवातीचा घटक म्हणजे उद्देशिका .उद्देशिका म्हणजे थोडक्यात मिनी संविधान .उद्देशिका ही संविधानाचा अर्थ अगदी कमी शब्दांमध्ये विस्तृतपणे सांगते .उद्देशिका संविधानाचा आशय स्पष्ट करते .भारतीय संविधानातील उद्देशिका खालीलप्रमाणे -
संविधानाच्या उद्देशिकेत म्हटल्यानुसार आम्ही भारताचे लोक या वाक्याने उल्लेख करून सुरुवात करण्यात आली आहे .आपले भारताचे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेद्वारे संमत करण्यात आले व याची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० रोजी करण्यात आली त्यामुळे २६जानेवारी हा दिवस राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येऊ लागला .संविधानाच्या या उद्देशिकेम्ध्ये १९७६ मध्ये ४२ व्या घटना दुरुस्तीनुसार समाजवादी व धर्मनिरपेक्ष या दोन शब्दांचा यात समावेश करण्यात आला .संविधानाच्या उद्देशिकेस संविधानाचा गाभा असेही म्हटले जाते .डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते .
संविधान रचनेस कशी झाली सुरुवात ?
१९३८ मध्ये राष्ट्रीय काँग्रेस चा संविधान सभा निर्मिती हा अजेंडा बनला होता .१९४५ मध्ये दुसर्या महा युद्धाच्या समाप्तीनंतर ब्रिटन मध्ये नवीन सरकार अस्तित्वात आले.या सरकारने आपले भारताविषयीचे नवे धोरण जाहीर केले व भारतीयांची मागणी पाहता संविधान सभा निर्माण करण्याचा निर्णय करण्यात आला .भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक त्रीमंत्री समिती भारतामध्ये पाठवले याला कॅबिनेट मिशन म्हणून ओळखले जाते या अंतर्गत संविधान सभेसाठी निवडणुका घेण्यात आल्या .संविधान सभेचे सुरुवातीला एकूण ३८९ सदस्य होते मात्र फाळणीच्या घटनेनंतर २९९ बाकी राहिले .या संविधान सभेचे डॉ.राजेंद्र प्रसाद अध्यक्ष तर हरेंद्र कुमार मुखर्जी हे उपाध्यक्ष होते .संविधान सभेने आपले कामकाज ९ डिसेंबर १९४६ पासून सुरु केले व ०२ वर्ष ११ महिने १८ दिवस काम करून २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानाचा मसुदा तयार करण्यात आला .
*संविधान निर्मिती मध्ये एकूण २२ समित्या होत्या.यापैकी सर्वात महत्वाची समिती म्हणजे मसुदा समिती .या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते के.एम.मुंशी, मोहम्मद सादुलाह, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, गोपाळ स्वामी अय्यंगार, एन. माधव राव हे सदस्य होते .
संविधान सभेचे महत्त्वाचे सदस्य
- बाबासाहेब आंबेडकर, घटनातज्ज्ञ व मसुदा समितीचे अध्यक्ष
- बी.एन. राव, घटनात्मक सल्लागार
- जवाहरलाल नेहरू, भारताचे पहिले पंतप्रधान
- सरदार वल्लभभाई पटेल, पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री
- जे.बी. कृपलानी, स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष
- मौलाना अबुल कलाम आझाद, शिक्षणमंत्री
- राजेंद्र प्रसाद, संविधान सभेचे अध्यक्ष
- सी. राजगोपालाचारी, भारताचे गव्हर्नर जनरल
- सैराटचंद्र बोस, बॅरिस्टर आणि भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते
- कृष्णा सिन्हा, बिहारचे पहिले मुख्यमंत्री
- बिनोदानंद झा
- अनुग्रह नारायण सिन्हा, बिहारचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री
- रफी अहमद किदवई
- असफ अली, रेल्वे आणि परिवहन मंत्री
- स्यामा प्रसाद मुखर्जी, उद्योग मंत्री, हिंदू महासभेचे अध्यक्ष
- मोटुरी सत्यनारायण, स्वातंत्र्य सेनानी
- राजकुमारी अमृत कौर, आरोग्य मंत्री
- हंसा मेहता, अखिल भारतीय महिला परिषदेचे अध्यक्ष
- एन.जी. रंगा
- दीप नारायण सिंह, बिहारचे मंत्री
- गोपीनाथ बोर्दोलोई, आसामचे राजकारणी

- सर सय्यद मुहम्मद सदुल्ला, आसाम
- पी. सुब्बारायण
- कैलाशनाथ काटजू
- एन. गोपालास्वामी अय्यंगार
- टी.टी. कृष्णामचारी
- रामेश्वर प्रसाद सिन्हा
- दुर्गाबाई देशमुख
- के.एम. मुन्शी
- काएद मिलथ मोहम्मद इस्माईल साहिब, आययूएमएलचे पहिले अध्यक्ष आणि खासदार
- कृष्ण बल्लभ सहाय
- फ्रँक अँथनी, अँग्लो-भारतीय प्रतिनिधी
- सर्वपल्ली राधाकृष्णन
- जॉन मथाई, भारताचे पहिले रेल्वेमंत्री
- प्रताप सिंह कैरॉन
- के. कामराज, तामिळनाडूचे तिसरे मुख्यमंत्री
- चिदंबरम सुब्रमण्यम
- जयपालसिंग मुंडा, माजी हॉकी कर्णधार आणि आदिवासी नेते
- हरगोविंद पंत
- मौलाना हिफझुर रहमान सेहोरवी
Comments
Post a Comment