सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
'संविधान ''लोकशाहीचा आधारस्तंभ 'या लेखाच्या आजच्या भागामध्ये आपले स्वागत .मागील भगत आपण संविधानाच्या पहिला भाग असणार्या 'संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र' या विषयी माहिती जाणून घेतली .आजच्या या भागामध्ये आपण 'नागरिकता ' (CITIZENSHIP)याविषयी माहिती जाणून घेणार आहोत .या लेखामध्ये संविधानात असणाऱ्या मुल तरतुदी व त्याविषयीचा आशय समजण्याकरिता नोकरी संकल्प द्वारे केलेले विश्लेषण याचा समावेश आहे .
*भाग दोन :नागरिकत्व (CITIZENSHIP)
*अनुच्छेद ५ :संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व
या संविधानाच्या प्रारंभी भारताच्या राज्यक्षेत्रात ज्या व्यक्तींचा अधिवास आहे आणि जि -
(क)जि व्यक्ती भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मली होती ;किवा
(ख)त्या व्यक्तीच्या माता-पित्यांपैकी कोणीही भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मले होते ;किंवा
(ग)जि अशा प्रारंभाच्या लगतपूर्वी किमान ०५ वर्षे इतका काल भारताच्या राज्यक्षेत्रात सामन्यत:निवासी आहे अशी प्रत्येक व्यक्ती भारताचे नागरिक असेल .
*विश्लेषण : यामध्ये भारताचे नागरिकत्व धारण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूळ आवश्यक पात्रतेचे निकष स्पष्ट करण्यात आले आहेत .संविधान निर्मिती करताना संविधान निर्मात्यांना भारताचे नागरिकत्व व्यक्तीस देताना पात्रतेचे निकष कसे असावेत याचे विस्तृत विवेचन अनुच्छेद ५ मध्ये देण्यात आलेले आहे .
*अनुच्छेद ६ :पाकिस्तानामधून स्थलांतर करून भारतात भारतात आलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क:
अनुच्छेद ५ मध्ये काहीही असले तरी,जि व्यक्ती आता पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्य्क्षेत्रातून स्थलांतर करून भारताच्या राज्यक्षेत्रात आलेली आहे ती व्यक्ती जर,-
(क)तिचा अथवा तिच्या माता -पित्यांपैकी किंवा तिच्या आजा-आजीपैकी कोणा एकाचा गावार्मेंट ऑफ इंडिया एक्ट १९३५ (मुळात अधिनियमित केल्याप्रमाणे )यात व्याख्या केलेल्या भारतात जन्म झाला असेल तर; आणि
(ख)(एक)अशा व्यक्तीने १९ जुलै १९४८ या दिवसा पूर्वी याप्रमाणे स्थलांतर केलेले असेल ,त्या बाबतीत आपल्या स्थलांतराच्या दिनांकापासून ती भारताच्या राज्यक्षेत्रात सामन्यत: निवासी असेल; तर किंवा
(दोन)अशा व्यक्तीने १९ जुलै १९४८ किंवा त्यानंतर याप्रमाणे स्थलांतर केलेलं असेल त्या बाबतीत तिने नागरिकत्वासाठी डोमिनियान ऑफ इंडिया सरकारने नोंदणी संदर्भात नियुक्त केलेल्या अधिकार्याकडे ,त्या सरकारने विहित केलेल्या नमुण्यात किंवा व रीतीने या संविधानाच्या प्रराम्भापुर्वी केलेल्या अर्जावरून ,अशा अधिकार्याने तिची भारताची नागरिक म्हणून नोंदणी केलेली असेल तर या संविधानाच्या प्रारंभी ती व्यक्ती भारताची नागरिक असल्याचे मानले जा ईल .
परंतु असे, कि कोणतीही व्यक्ती आपल्या अर्जाच्या दिनांकाच्या लगतपूर्वी निदान सहा महिने भारताच्या राज्यक्षेत्रात निवासी असल्याशिवाय तिची याप्रमाणे नोंदणी केली जाणार नाही .
*विश्लेषण :१९३५ च्या भारत सरकार कायद्या अंतर्गत व्याख्या करण्यात आलेल्या भारतात मध्ये अर्थात फाळणी पूर्वीच्या भारतामध्ये (पाकिस्तान ,बांगलादेश ,नेपाळ यांचा संयुक्त प्रदेश) यामध्ये जर व्यक्तीचा जन्म झालाकिंवा तिच्याकडे भारताची नागरिक म्हणून नोंदणी करण्यासाठी तिने अर्ज केला तर ती व्यक्ती पत्र असेल. ब्रिटीश भारताला स्वातंत्र्य देत असताना त्यांनी संयुक्त भारताचे विभाजन करण्याची योजना यशस्वी करून गेले .फाळणीच्या घटने दरम्यान उसळेल्या धार्मिक दंगलींमध्ये अनेकांचे प्राण गेले .
*अनुच्छेद ७ :स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क -
अनुच्छेद ५ व ६ मध्ये काहीही असले तरी ,जि व्यक्ती १ मार्च १९४७ या दिवसानंतर भारताच्या राज्य्क्षेत्रातून स्थलांतर करून सध्या पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्यक्षेत्रात गेलेली आहे,ती व्यक्ती भारताची नागरिक आहे असे मानले जाणार नाही .
परंतु असे कि जि व्यक्ती ,आता पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्यक्षेत्रात याप्रमाणे स्थलांतर केल्यानंतर पुन्हा ,पुन्हा स्थायिक होण्यासाठी किवा कायमचे परत येण्यासाठी ,कोणत्याही कायद्याच्या प्रधीकाराद्वारे किंवा तद्न्व्ये दिलेल्या परवान्याखाली भारताच्या राज्यक्षेत्रात परतलेली आहे .तिला या अनुच्छेदातील कोणतीही गोष्ट लागू असणार नाही व अनुच्छेद ६ (खंड ख) च्या प्रयोजनांकरिता ,अशी प्रत्येक व्यक्ती १९ जुलै १९४८ या दिवसानंतर स्थलांतर करून भारताच्या राज्यक्षेत्रात आलेली व्यक्ती असल्याचे मानण्यात येईल .
*अनुक्छेद८ :मुळच्या भारतीय असलेल्या ,पण भारताबाहेर राहणाऱ्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क -
अनुच्छेद ५ मध्ये काहीही असले तरी,जि व्यक्ती किवा जिच्या माता पित्यांपैकी आजा-आजीन्पैकी कोणीही एक गव्हर्मेंट ऑफ इंडिया एक्ट १९३५ यात व्याख्या केलेल्या भारतात जन्मले होते आणि जि त्याप्रमाणे व्याख्या केलेल्या भारताच्या बाहेरील कोणत्याही देशात सामन्यत:निवास करत आहे अशी कोणतीही व्यक्ती ,जर तिने त्या त्या काळी ज्या देशात ती राहत असेल त्या देशातील भारताच्या राजदौतिक किवा वाणिज्यदौतिक प्रतिनिधींकडे ,डोमिनियान ऑफ इंडिया सरकारने किवा भारत सरकारने विहित केलेल्या नमुन्यात व रीतीने या संविधांच्या प्राराम्भापुर्वी वा नंतर नागरिकत्वासाठी केलेल्या अर्जांवरून अशा राजदौतिक किवा वाणिज्यदौतिक प्रतिनिधीने तिची भारताची नागरिक म्हणून नोंदणी केलेली असेल तर भारताची नागरिक असल्याचे मानले जाईल .
*अनुक्छेद९ :परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपाद्नाऱ्या व्यक्ती नागरिक नसणे -
कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादले असेल तर ,ती व्यक्ती अनुच्छेद ५ च्या आधारे भारताची नागरिक असणार नाही ,अथवा अनुच्छेद ६ किंवा अनुच्चेद ८ च्या आधारे ती व्यक्ती भारताची नागरिक असल्याचे मानले जाणार नाही .
अनुच्छेद:१० :नागरिकत्वाचे हक्क चालू राहणे -
या भागातील पुर्वगामी तरतुदींपैकी कोणत्याही तरतुदी अन्वये जि भारताची नागरिक आहे किंवा असल्याचे मानले जाते अशा प्रत्येक व्यक्तीचे नागरिकत्व,संसद जो कोणताही कायदा करील त्याच्या त्याच्या तर्तुदिना अधीन राहून चालू राहील.
अनुच्छेद ११ :संसदेने नागरिकत्वाच्या हक्काचे कायद्याद्वारे विनियमन करणे :
या भागाच्या पुर्वगामी तर्तुदितील कोणत्याही गोष्टींमुळे नागरिकत्वाचे संपादन व समाप्ती आणि नागरिकत्व विषयक अन्य सर्व बाबी यांच्यासंबंधी कोणतीही तरतूद करण्याच्या संसदेच्या अधिकाराचे न्युनिकरन होणार नाही .
*विश्लेषण - या संपूर्ण अनुच्छेद ५ ते ११ दरम्यान नागरिकत्व या भागामध्ये भारतात राहणाऱ्या व्यक्तींचे नागरिकत्व कसे असावे तसेच दोन देशांच्या झालेल्या फाळणीमुळे भारतीय नागरिक व पाकिस्तान तसेच इतर देशांचे नागरिक यांची ओळख स्पष्ट व्हाही व भारतीयांना नागरिकत्व भारतीय असण्याचे सर्व हक्क व अधिकार मिळावेत असा उद्देश्य अनुच्छेदाच्या रच्नेमागे असावा . याविषयी जर आजच्या काळामध्ये याची तुलना करायची झाली तर NRC व CAA शी या प्रकरणाचि तुलना केली तर नागरिकत्व या भागाचे महत्व तुम्हाला सहजरीत्या जाणवेल .ही होती भाग २ विषयीची माहिती भेटूया उद्या भाग 3 सह .
Comments
Post a Comment