mahadbt Scholership 2023
mahadbt login,mahadbt scholarship 2021-22 last date,mahadbt scholarship for sc,students,mahadbt scholarship amount,,aaple sarkar mahadbt,mahadbt schol,mahadbt scholarship ,महाडीबीटी शिष्यवृत्ती २०२२ -२३नोकरी संकल्प,nokarisankalp,nokarisankalp.blogspot.com
*महाडीबीटी शिष्यवृत्ती २०२3 -२4 करिता अर्ज करणे सुरु आहे .या शिष्यवृत्ती अंतर्गत येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांची व आवश्यक कागदपत्रांची संविस्तर माहिती !
*अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे* -
⇓
- .आधार कार्ड
- तसेच मोबाईल नंबर व email id.
- कास्ट सर्तीफिकेट
- डोमासाईल सर्तीफिकेट
- उत्पन सर्तीफिकेट
- शाळा सोडल्याचा दाखला
- आधार कार्डशी लिंक असणारे बँक पासबुक
- चालू वर्षीची प्रवेश /फिस पावती
- मागील वर्षीचे मार्क्षिट
- १० वी १२ वी चे मार्क्षिट
- रेशन कार्ड झेरॉक्स
- बोनाफाईड (optional )
- जात वैधता प्रमाणपत्र (Cast Validity )
*विभाग क्र.१.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
या विभाग अंतर्गत भारत सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजने करिता विद्यार्थी अर्ज करू शकतो या योजनेचे फायदे खालील प्रमाणे:-
या योजनेअंतर्गत नवबौध्द / अनुसूचित जातीतील पात्र विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे लाभ मिळतील :
१. प्रवेशाच्या तारखेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत गट १, गट २, गट ३, गट ४, प्रति महिना (अधिकतम १० महिने) याप्रमाणे देखभाल भत्ता प्रदान केला जातो.
डे स्कॉलर : (दरमहा रुपयांमध्ये)
गट १ : ५५०
गट २ : ५३०
गट ३ : ३००
गट ४ : २३०
होस्टेलर : (दरमहा रुपयांमध्ये)
गट १ : १२००
गट २ : ८२०
गट ३ : ५७०
गट ४ : ३८०
शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे दिव्यांग (अपंगत्व प्रकार) असलेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त भत्ते पुढीलप्रमाणे :
अपंगत्वाचे प्रकार : (दरमहा रुपयांमध्ये)
अंधत्व / कमी दृष्टी गट १ आणि २ : १५०
गट ३ : १२५
गट ४ : १०० शासन निर्णय (अ) नुसार अतिरिक्त भत्ते
कुष्ठरोग निवारण झालेले सर्व गटांसाठी
१. वाहतूक भत्ता १०० / - पर्यंत (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी)
२. एस्कॉर्ट भत्ता १०० / -
३. वसतिगृहातील कर्मचा-यांना काळजी घेणारे म्हणून विशेष वेतन भत्ता १००/- अतिरिक्त भत्ते शासन निर्णयातील (बी, सी, डी) प्रमाणे
कर्णबधीर सर्व गटांसाठी.
१. वाहतूक भत्ता १०० / - पर्यंत (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी)
शासन निर्णय (बी) नुसार अतिरिक्त भत्ते
लोकोमोटर अपंगत्व सर्व गटांसाठी :
१. वाहतूक भत्ता १०० / - पर्यंत (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी)
शासन निर्णय (बी) नुसार अतिरिक्त भत्ते
मानसिक दुर्बलता / मानसिक आजार सर्व गटांसाठी:
१. वाहतूक भत्ता १०० / - पर्यंत (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी)
२. एस्कॉर्ट भत्ता १०० / -
३. वसतिगृहातील कर्मचा-यांना काळजी घेणारे म्हणून विशेष वेतन भत्ता १००/-
४. अतिरिक्त प्रशिक्षण भत्ता १५० / - अतिरिक्त भत्ते शासन निर्णयातील (बी, सी, डी, इ) प्रमाणे
ऑर्थोपेडिक अपंगत्व सर्व गटांसाठी:
१. वाहतूक भत्ता १०० / - पर्यंत (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी)
२. एस्कॉर्ट भत्ता १०० / -
३. वसतिगृहातील कर्मचा-यांना काळजी घेणारे म्हणून विशेष वेतन भत्ता. १०० / - अतिरिक्त भत्ते शासन निर्णयातील (बी, सी, डी) प्रमाणे
३) विद्यार्थ्यांमार्फत संस्थांना दिल्या जाणाऱ्या देखभाल भत्ता व्यतिरिक्त सर्व अनिवार्य शुल्क / अनिवार्य देय शुल्क अर्थात वित्तपुरवठा (शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क) इ. या योजनेखाली समाविष्ट केले आहे.
*अर्ज करण्याकरिता आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे :-
१. आई-वडिलांचे / पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. २.५ लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
२. विद्यार्थी अनुसूचित जातीचा किंवा नवबौद्ध असावा.
३. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा
४. विद्यार्थी शालांत परीक्षा किंवा इतर समकक्ष मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण असावा.
५. अयशस्वी : विद्यार्थी प्रथम वर्षी नापास झाला तरी त्याला परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता अनुज्ञेय राहील, एकाच वर्गात दुसऱ्या प्रयत्नात सुद्धा अनुत्तीर्ण झाल्यास त्याला / तिला कोणताही भत्ता मिळणार नाही. आणि दोन प्रयत्नानंतर विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पुढील वर्गात गेल्यास लाभ अनुज्ञेय राहतील.
६. महाराष्ट्राबाहेर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा भारतसरकारच्या नियमानुसार समान नियम अनुज्ञेय राहतील.
७. फक्त २ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी.
*या विभागा अंतर्गत पुढील योजना
२.पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी आणि परीक्षा फी /फ्रीशिप
या योजनेचे फायदे खालील प्रमाणे:-
विद्यार्थ्यांमार्फत संस्थांना दिले जाणारे शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क, जे अनिवार्य किंवा सक्तीचे देय आहे, ते या योजनेत समाविष्ट आहे.
*अर्ज करण्याकरिता आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे :-
• आई-वडिलांचे / पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. २,५०,००० पेक्षा जास्त असावे.
• विद्यार्थी अनुसूचित जातीचा किंवा नवबौद्ध असावा.
• विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा
• विद्यार्थी शालांत परीक्षा किंवा इतर समकक्ष मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण असावा.
• शासकीय मान्यताप्राप्त असलेली आणि महाराष्ट्रात स्थित असलेली संस्था असावी.
• विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी केवळ CAP माध्यमातून प्रवेश घेतलेला असावा.
• संपूर्ण अभ्यासक्रम कालावधीत केवळ एकदा अनुत्तीर्ण ग्राह्य धरले जाईल.
३.व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता:-
*या योजनेचे फायदे खालील प्रमाणे:-
देखभाल भत्त्याद्वारे अर्जदारास व्यावसायिक अभ्यासक्रम पुस्तके, स्टेशनरी, निवास आणि अन्न यासाठीचा निधी खालीलप्रमाणे मिळवता येईल.
(वसतिगृहात प्रवेश घेतल्यापासून ते परीक्षेपर्यंत किंवा अधिकतम १० महिन्यांसाठी)
१. सरकारी वसतिगृहांमध्ये राहणा-या विद्यार्थ्यांसाठी
i) अभ्यासक्रम कालावधी ४ ते ५ वर्षे: दरमहा ७०० / - रुपये (७००० रुपये).
ii) अभ्यासक्रम कालावधी २ ते ३ वर्षांच्या दरम्यान: दरमहा ५०० / - (५००० रुपये)
iii) अभ्यासक्रम कालावधी २ वर्षे : दरमहा ५०० / - (५००० रुपये)
२. शासकीय वसतिगृहासाठी पात्र ठरलेल्या परंतु शासकीय वसतीगृहांमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी
i) अभ्यासक्रम कालावधी ४ ते ५ वर्षे: दरमहा १००० / - रुपये (१०००० रुपये).
ii) अभ्यासक्रम कालावधी ४ ते ५ वर्षे: दरमहा ७०० / - रुपये (७००० रुपये).
iii) अभ्यासक्रम कालावधी २ वर्षे : दरमहा ५०० / - (५००० रुपये)
*अर्ज करण्याकरिता आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे :-
• व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले विद्यार्थी.
• विद्यार्थी भारत सरकारचे शिष्यवृत्ती धारक असावेत
• उत्पन्नाची मर्यादा भारत सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेनुसार लागू असेल, म्हणजे वार्षिक उत्पन्न मर्यादा २.५ लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
• व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेले आणि वसतिगृहात राहत असलेले विद्यार्थी पात्र असतील (शासकीय किंवा संस्थेच्या वसतिगृहात किंवा बाहेर राहणारे).
४.राजर्षि छत्रपती शाहू महाराज मेरिट स्कॉलरशिप
*या योजनेचे फायदे खालील प्रमाणे:-
या योजनेअंतर्गत शालांत परीक्षेत ७५ टक्के किंवा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या आणि ११ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी दरमहा रु. ३००/- प्रमाणे शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल.
(१० महिने प्रत्येकी ११ वी आणि १२ वी इयत्तेसाठी) ही शिष्यवृत्ती भारत सरकारच्या शिष्यवृत्ती आणि Freeship व्यतिरिक्त दिली जाईल*अर्ज करण्याकरिता आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे :-• विद्यार्थी अनुसूचित जाती श्रेणी अंतर्गत असावा.
• शिष्यवृत्तीसाठी कोणतीही उत्पन्न मर्यादा नाही.
• विद्यार्थी 11 वी किंवा 12 वी वर्गात शिकणारा असावा.
• विद्यार्थी शालांत परीक्षा ७५% किंवा त्यापेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण असावा.
• विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा.
५.पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती अपंग व्यक्तींसाठी
*या योजनेचे फायदे खालील प्रमाणे:-
या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे लाभ मिळतील :
१. प्रवेशाच्या तारखेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत गट अ, गट ब, गट क, गट ड, गट इ प्रति महिना (अधिकतम १० महिने) याप्रमाणे देखभाल भत्ता प्रदान केला जातो.
डे स्कॉलर : (दरमहा रुपयांमध्ये)
गट अ : ५५०
गट ब : ५३०
गट क : ५३०
गट ड : ३००
गट इ : २३०
होस्टेलर : (दरमहा रुपयांमध्ये)
गट अ : १२००
गट ब : ८२०
गट क : ८२०
गट ड : ५७०
गट इ : ३८०
२. अंध : वाचक भत्ता (अतिरिक्त):
गट अ, ब, क : १००
गट ड : ७५
गट इ : ५०
३. देखभाल भत्त्याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांमार्फत संस्थांना दिले जाणारे शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क, जे अनिवार्य किंवा सक्तीचे देय आहे, ते या योजनेत समाविष्ट आहे
४. व्यावसायिक किंवा तंत्रशिक्षण अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास दौरा करण्यासाठी अतिरिक्त रु. ५००/- किंवा दरवर्षी लागू शुल्क प्रदान करण्यात येते. (अभ्यास दौरा शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग असणे आवश्यक आहे.)
५. जर प्रकल्प अभ्यासक्रमासाठी अनिवार्य असेल तर छपाई आणि टायपिंगसाठी उमेदवारास अतिरिक्त रु. ६००/- किंवा दरवर्षी लागू शुल्क प्रदान करण्यात येते, परंतु त्यासाठी प्राचार्य प्रमाणपत्र अनिवार्य असेल.
६. एम. फील आणि पीएचडी अभ्यासक्रमांतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण गट अ, गट ब, गट क नुसार देखभाल भत्ता प्रदान करण्यात येईल.
७. महिन्याच्या २० तारखेपर्यंत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्या महिन्याचा देखभाल भत्ता अनुज्ञेय राहील.*अर्ज करण्याकरिता आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे :-
*अर्ज करण्याकरिता आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे :-(शासन निर्णय दिनांक 7 .१०. 201७, 31 .३.2018 तसेच ०७.०८.२०१८ प्रमाणे, ११.०७.२०१९)
1.अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. तथापि महाराष्ट्र - कर्नाटक राज्य सीमा भागातील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
2.अर्जदाराच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
3.शासन निर्णयानुसार प्रथम दोन मुले या योजनेसाठी पात्र आहेत.
4.सामान्य श्रेणी आणि एसईबीसी श्रेणी अंतर्गत प्रवेश घेतला आहे अशा उमेदवार पात्र आहेत.
5.शासन निर्णय दिनांक 07/10/17 (डीएचई अभ्यासक्रम) मधील अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.
6.अर्जदाराने इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
7.या योजनेचा लाभ दूरस्थ पध्दतीने (Open /Distance /Virtual Learning) अथवा अर्धवेळ (Part-Time) स्वरुपात चालविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार नाही.
8.तसेच योजेनच्या लाभाकरीता अनुज्ञेय असलेला अभ्यासक्रम सुरु करण्यास शासनाची व संबंधित सक्षम संस्थाची (AICTE/PCI/COA/MCI/NCTE, विद्यापीठ / शिक्षण मंडळ, इ.) पूर्व मान्यता व संलग्नता असणे आवश्यक आहे.
9.अर्जदार विद्यार्थ्यास प्रत्येक सत्र अथवा वर्षाची परीक्षा देणे आवश्यक राहिल.
योजना क्र२.गुणवान विद्यार्थांना आर्थिक सहाय्य*या योजनेचे फायदे खालील प्रमाणे:-माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळाच्या मुंबई, पुणे, लातूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापुर, अमरावती, नागपुर व कोकण या परीक्षा विभागातील परीक्षेत वरचा क्रमांक मिळविणाऱ्या गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते.
(शासन निर्णय दिनांक 17.5.1984, 1.03.2011 व 11.09.2003)
सदर शिष्यवृत्तीसाठी खालीलप्रमाणे 11 प्रकारच्या शुल्काचा लाभ देण्यात येतो.
1. प्रवेश शुल्क - 100 टक्के
2. सत्र शुल्क - 100 टक्के
3. भोजन शुल्क - 150 रु. प्रतिमाह प्रमाणे दहा महिन्याकरिता = 1500 रु.
4. वैद्यकीय खर्च - विद्यार्थ्यांचा झालेला खर्च किंवा रु. 120 यापैकी जी रक्कम कमी असेल अशी रक्कम.
5. परीक्षा शुल्क - 100 टक्के
6. शिक्षण शुल्क - 100 टक्के
7. ग्रंथालय शुल्क - 100 टक्के
8. पुस्तके व इतर स्टेशनरी साहित्य -
a) 11 वी, 12 वी - 300 रु. वार्षिक
b) पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रम (science, veterinary and Agriculture अभ्यासक्रम वगळून) - 500 रु. वार्षिक
c) पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रम (science, veterinary and Agriculture अभ्यासक्रमासाठी) - 700 रु. वार्षिक
d) वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रम - 1000 रु. वार्षिक
e) पदवीका अभ्यासक्रम - 500 रु. वार्षिक
9. वसतीगृह शुल्क - 600 रु. वार्षिक
10. प्रयोगशाळा शुल्क - 100 टक्के
11. जिमखाना शुल्क - 100 टक्के
*अर्ज करण्याकरिता आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे :-1. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षेत वरचा क्रमांक मिळविणारे गुणवान विद्यार्थी सदर शिष्यवृत्ती साठी पात्र आहेत.
2. सदर योजनेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीच्या आधारे निवड पत्र पाठविण्यात येते. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करतांना सदर पत्राची छायांकित प्रत अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच त्या सोबत संबंधित विद्यार्थ्यांनी या योजनेचे नियम मान्य असल्याचे संमती पत्र अपलोड करणे आवश्यक आहे.
3. पात्र विद्यार्थांची यादी संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. संबंधित यादीमध्ये नावे असलेले विद्यार्थीच सदर शिष्यवृत्तीसाठी (Fresh) अर्ज करु शकतात.
4. सदर यादीतील महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर शिकत असलेले महाराष्ट्रीयन विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
5. शिष्यवृत्ती पुढे चालू राहण्यासाठी विद्यार्थ्यांचे वर्तन, प्रगती समाधानकारक असणे आवश्यक आहे.
6. विविध शुल्काची (फी ची) प्रतीपुर्ती शासनाने किंवा संबंधीत विद्यापीठाने मान्य केलेल्या दरानुसार केली जाईल.
7. या योजनेचा लाभ घेत असतांना विद्यार्थ्यांला केंद्र अथवा राज्य शासनाच्या इतर कोणत्याही शिष्यवृत्तीच्या अथवा सवलतीचा लाभ घेता येणार नाही, मात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या बाबतीत ही अट लागू नाही, त्यांना केंद्र / राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती / सवलती नुसार शिक्षण फी किंवा परीक्षा फी ची भरपाई होत असेल तर अशी शिक्षण फी किंवा परीक्षा फी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देय नाही. तसेच राष्ट्रीय प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती घेणाऱ्या विद्यार्थास सदर योजनेचा लाभ घेता येईल. मात्र राष्ट्रीय प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती नुसार मिळणाऱ्या पुस्तक अनुदानाची रक्कम वजा करून सदर शिष्यवृत्तीसाठी पुस्तक अनुदानाची रक्कम देय आहे.
8. गुणवान विद्यार्थास एखाद्या वर्षी गुणाची टक्केवारी कमी असल्यास त्याचे त्यावर्षी आर्थक सहाय्य स्थगीत ठेवण्यात येईल. पुढील वर्षी सदर विद्यार्थाने गुणाची अट पूर्ण केल्यास त्याचे आर्थिक सहाय्य सुरु करण्यात येईल.
योजना क्र३.माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य*या योजनेचे फायदे खालील प्रमाणे:-- *प्रवेश शुल्क 100%
- * सेमेस्टर फी 100%
- *ग्रंथालय शुल्क 100%
- *प्रयोगशाळा शुल्क 100%
*अर्ज करण्याकरिता आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे :-(शासन निर्णय दिनांक 14.01.19 85 अनुसार)
1. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या किंवा महाराष्ट्रात भरती झालेल्या मेजर, नौदल वा वायु दलातील तत्सम दर्जाच्या हुद्यापर्यंत (वा त्यापेक्षा कमी दर्जाच्या हुद्यावरुन) सेवेतुन निवृत्त झालेल्या माजी सैनिकांच्या मुलांना/मुलींना, पत्नींना/विधवांना या योजनेखाली शैक्षणिक सवलती देय आहेत.
2. वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास अथवा वरच्या वर्गात पदोन्नत न झाल्यास या सवलती स्थगीत ठेवण्यात येतील. मात्र जर नंतर विद्यार्थी वरच्या वर्गात पदोन्नत झाला की त्यास ही सवलत पुढे चालू ठेवण्यात येईल
3. या सवलतीचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीस अन्य दुसऱ्या योजनेखाली फी माफी, पुस्तक अनुदान, गणवेश अनुदान इत्यादी सवलतींचा लाभ या सवलती बरोबर घेता येणार नाही. तसेच एकाच वेळी एका विद्यार्थ्याला एका पेक्षा जास्त अभ्यासक्रमांना या सवलतीचा लाभ दिला जाणार नाही.
4. केवळ शासकीय, अनुदानित महाविद्यालयांमधील अभ्यासक्रमास प्रवेश घेणारे विद्यार्थीच अर्ज करण्यास पात्र आहेत.
5. महाराष्ट्र बाहेर शिकत असलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत.
योजना क्र४.एकलव्य आर्थिक सहाय्य*या योजनेचे फायदे खालील प्रमाणे:-
(शासन निर्णय दिनांक 07.02.1996)
सदर शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या विद्यार्थांना प्रतिवर्ष रु 5000/- प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते.
*अर्ज करण्याकरिता आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे :-(शासन निर्णय दि. 07.02.1996 व 5.02.2004)
1.कला , वाणिज्य , विधी व शिक्षणशास्त्र शाखेमध्ये पदवी अभ्यासक्रमामध्ये किमान 60 टक्के व विज्ञान शाखेमध्ये पदवी अभ्यासक्रमामध्ये किमान 70 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
2.विद्यार्थांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. 75,000/- किंवा त्यापेक्षा कमी असावे.
3.विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
4.संबंधित लाभार्थी विद्यार्थी कुठेही पुर्णवेळ नोकरी करणारा नसावा.
5.शिष्यवृत्ती घेणारा विद्यार्थी शुल्क माफीच्या सवलतीस पात्र राहील.
6.अर्धवेळ अभ्यासक्रमाचा विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र राहणार नाही.
7.बी .एड. प्रशिक्षण अभ्यासक्रम तसेच एम.फील व पी.एच.डी व तत्सम अभ्यासक्रमासाठी ही योजना लागू नाही.
8.सदर शिष्यवृत्ती मंजुर झाल्यास इतर केंद्र / राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येणार नाही.
9.महाराष्ट्र राज्याच्या बाहेर शिकत असलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत
अर्ज करण्यासाठी संपर्क :संकल्प डिजिटल फोटोज &मल्टी सर्विस सेंटर आष्टी
Comments
Post a Comment