तलाठी भरती २०२३
*तलाठी भरती २०२३ बाबत महत्वाची माहिती समोर आली आहे त्यानुसार तलाठी भरती २०२३ करिता घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा दिनांक व वेळ जाहीर करण्यात आली आहे .जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार काहीच दिवसांमध्ये तलाठी परीक्षेचे हॉल तिकीट येणार आहे .तलाठी परीक्षा भरती हि TCS कंपनीकडून घेण्यात येणार आहे .
*तलाठी परीक्षा दिनांक :
सदर परीक्षा हि दिनांक १७ ऑगस्ट २०२३ ते १४ सप्टेंबर २०२३ या १९ दिवसांच्या कालावधीमध्ये घेण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे तसेच हि परीक्षा एकूण तीन सत्रांमध्ये अर्थात तीन ब्याच मध्ये घेण्यात येईल .एका दिवसात तीन सत्रात परीक्षा असेल.
*एकूण सत्र व त्यांचा वेळ खालीलप्रमाणे
*१ ले सत्र सकाळी ०९ ते ११ या वेळेत असेल
*दुसरे सत्र दुपारी १२.३० ते २.३० या वेळेत असेल
*तिसरे सत्र 4.३० ते संध्याकाळी ६.३० पर्यंत असेल
*जाहीर करण्यात आलेल्या माहिती नुसार उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव शहराचे नाव परीक्षेचे दिनांकाच्या किमान पाच ते सहा दिवस आधी उपलब्ध करून देण्यात येईल .तसेच परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट)०३ दिवस आगोदर उपलब्ध करून देण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे .
*उमेदवारांना या बाबतचा तपशील हा त्यांच्या रजिस्टर इमेल आयडीवर उपलब्ध करून देण्यात येईल तेव्हा याबाबत अपडेट राहण्यासाठी आपल्या रजिस्टर इमेल आयडीवर लक्ष केंद्रित असू द्यावे .
*हॉल तिकीट पहा (लवकरच उपलब्ध होईल )
Comments
Post a Comment