सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024 !
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या सुरू असलेली राज्यातील सर्व महिलांसाठी ही स्कीम .या योजने अंतर्गत राज्यातील महिलांना 1500 रुपये एवढी रक्कम ही दरमहा शासन देणार आहे .शासनातर्फे घरामधील सर्वसामान्य महिला नागरिकांसाठी ही अत्यंत उपयोगी व लाभदायी योजना असणार आहे .महिलांकडे घर सांभाळण्याची जी कसरत त्यांना करावी लागते त्यामध्ये सरकारने थोडा दिलासा देण्याचे काम केले आहे .मध्य प्रदेश मधी ही योजना मध्य प्रदेश सरकारच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी ठरलेली पाहायला मिळाली आहे व या योजनेला महिलांचा प्रचंड प्रतिसाद तेथे मिळाला आहे त्याच धर्तीवर ही योजना महाराष्ट्र राज्यात राबवण्यात येत आहे .
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे स्वरूप :
या योजने अंतर्गत योजने मध्ये मोडणाऱ्या महिलांना 1500 रुपये शासनाद्वारे प्रति महिना म्हणजेच 1 वर्षाला 18000 रुपये इतकी रक्कम देण्यात येणार आहे .
काय आहे पात्रता :
१.या योजने करीत अर्ज करण्यासाठी एका घरामधील दोन महिलांना याचा लाभ घेता येणार आहे .
२.कुटुंब प्रमुखाची ,कुटुंबाची उत्पन्न मर्यादा ही २.५लाख ही आहे .
३.महिला परराज्यातील असून महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न केलेले असल्यास पतीची कागदपत्रे लागणार
४.21 वर्षे ते 65 वर्षांपर्यंत वयाची मर्यादा
कोणती कागदपत्रे लागणार :
१.पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड
२.शाळा सोडल्याचा दाखल,मतदान कार्ड ,आधार कार्ड,उत्पन्न,बँकेचे पासबुक ,अर्ज ,अर्जदाराचे हमीपत्र ,पासपोर्ट फोटो,अधिवास प्रमाणपत्र
कोठे अर्ज करता येणार ?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना करीता अर्ज अंगणवाडी सेविका,अंगणवाडी मदतनीस,ग्रामसेवक,वॉर्ड अधिकारी,सामान्य महिला सेतू सुविधा केंद्र
टीप:महिला नारीशक्ती दूत ऍप द्वारे ऑनलाईन मोबाईल नेही महिला अर्ज करू शकतात त्याची लिंक खाली देण्यात आली आहे :
Comments
Post a Comment