सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
चालू घडामोडी दिणांक 10 मार्च 2022
*भारतातील पहिल्या महिला शिक्षिका तसेच समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आज स्मृतिदिन.
1.महाराष्ट्र राज्याच्या महत्वाच्या गृहसचिव पदी आनंद लिमये यांची निवड निवड करण्यात आली आहे.यासह राज्य शासनाने नऊ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले आहे.
2.राज्य सरकारने सहकार कायद्यात सुधारणा करून विधे विधानसभेमध्ये मंजूर केले आहे.सहकार कायद्यात घटना दुरुस्तीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या जाचक तरतुदी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्याच्या सहकार कायद्यात बदल करण्यात आला आहे.
3.राज्यातील प्रत्येक दुकानाच्या पाटीवरील नाव इतर भाषांसह ठळक मराठी मध्ये मोठ्या अक्षरात लिहावे लागेल अशी तरतूद असणारे विधेयक राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात संमत करण्यात आले.या विधेयकात केलेलय सुधारनेमुळे आता संघीय सहकारी संस्था संचालकांची संख्या 21 वरून 25 होणार आहे.
4.कोओव्याक्स या कोरोना प्रतिबंधक लसीला भारताच्या औषध महानियंत्रकानी 18 वर्षांखालील लहान मुलांच्या लसीकरणासाठी आपत्कालीन वापरास मंजुरी देण्यात आली आहे.
5. भारताचा वेगवान क्रिकेट गोलंदाज एस.श्रीसंत ने क्रिकेटच्या सर्व प्रकारामधून निवृत्तीची निर्णय जाहीर केला.श्रीसंतची केरळ एक्स्प्रेस म्हणून क्रिकेट जगतात ओळख होती.
6.आयसीसीच्या महिन्यामधील सर्वोत्तम खेळाडूच्या भारतातील श्रेयस आययर ,मिताली राज,दीप्ती शर्मा याना नामांकन मिळाले आहे.
7.छत्तीसगड च्या मुख्यमंत्र्यांनी भुपेश बघेल यांनी छत्तीसगड चा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला .यावेळी नमूद करण्यासारखी विशेष गोष्ट ही की त्यांनी अर्थसंकल्पाची प्रत ही शेणापासून बनलेल्या बॅगे मधून आणली.देशात पहिल्यांदाच आशा प्रकारे शेणाच्या बॅगेत अर्थसंकल्पाची प्रत आणण्याचा प्रकार घडला आहे.
8.क्रिकेट चे नियम ज्या क्लबद्वारे बनवण्यात येतात त्या लंडन येथील मेरीलबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) ने क्रिकेटमध्ये काही नवे नियम लागू केले आहेत.या नव्या नियमानुसार मंकडिंग पद्धतीद्वारे फलंदाजाला रण आउट करणे अधिकृत ठरणार आहे.चेंडूला थुंकी लावण्यावर बंदी घालण्यात आली आहे तसेच जर फलंदाज कॅच आउट झाला असेल तर येणारा फलंदाज स्राईक घेईल.
Comments
Post a Comment