सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
1.कोरोनाच्या काळामध्ये अडचणीत आलेल्या उद्योग,व्यापार या क्षेत्राना राज्य सरकारने दिलासा देताना विक्री कराची 10 हजार रुपये पर्यंतची सर्व थकबाकी माफ तर 10 लाख पर्यंत थकबाकी असणाऱ्या थकबाकीदारांनी 20 टक्के रक्कम भरल्यास उरलेली 80 टक्के रक्कम माफ करण्याची तरतूद असणारे अभय योजना विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले.
2.महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण व बळकटीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने 2252 कोटी 60 लाख रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.
3..भारत ब्रॉडबँड निगम लिमिटेड चे बीएसएनएल मध्ये विलीनीकरण करण्यात येणार आहे.
4.पतंजली समूहाचा भाग असणाऱ्या रुची सोया इंडस्ट्रीजच्या फॉलो ऑन समभागांच्या विक्रीसह पतंजली समूह भांडवली बाजारामध्ये उतरणार आहे.
5.भारताचा युवा बॅडमिंटन पटू लक्ष्य सेन याने ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे उपविजेता पद पटकावले.
6.जगातील सर्वात मोठी लोकप्रिय ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धा असणाऱ्या ipl मध्ये पाहिलयंदाच क्रिको नावाच्या सांख्यिकी यंत्रमानव (रोबो)चा वापर करण्यात येत आहे.
7.युक्रेन व रशिया युद्धामुळे युक्रेनच्या होणारी हानी थांबविण्यावर भारत व ऑस्ट्रेलिया या दोन देशांदरम्यान सहमती झली आहे.
Comments
Post a Comment