सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
"मूलभूत हक्क"
मूलभूत अधिकार किती आहेत ,भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार ,हे कोणत्या स्वरूपाचे आह मूलभूत हक्क व कर्तव्य मूलभूत, हक्क कोणत्या देशाकडून घेतले, मालमत्तेचा हक्क हा कोणत्या स्वरूपाचा हक्क आहे, मूलभूत हक्क का दिले जातात,नोकरी संकल्प ,मुलभूत हक्क,सामन्तेचा हक्क
भारतीय संविधान 'लोकशाहीचा आधारस्तंभ या लेखामध्ये आपले स्वागत मागील लेखामध्ये आपण संविधानाचा भाग २ नागरिकत्व य विषयी माहिती जाणून घेतली आता आजच्या या लेखामध्ये आपण संविधानाचा पुढील भाग भाग 3 -'मुलभूत अधिकार 'जाणून घेणार आहोत .भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना मुलभूत अधिकार दिलेले आहेत.भारतीय नागरिकांच्या दृष्टीने ते अत्यंत महत्वपूर्ण आहेत .भारत हा विविधतेने नटलेले देश आहे .विविध धर्माचे लोक इथे एकोप्याने रहतात हाच एकोपा टिकून राहावा याकरिता काळजीपूर्वक विचार करून संविधान निर्मात्यांनी संविधानातील तरतुदी केलेल्या आहेत हे आपणास समजून येते .चला जाणून घेऊयात संविधानाने आपणा भारतीयांना दिलेल्या मुलभूत अधिकारांविषयी :
.
संविधान भाग 3 -मुलभूत अधिकार/हक्क
एकूण मुलभूत हक्क -०६
अनुच्छेद १२ -मुलभूत हक्काची व्याख्या :मुलभूत हक्क या भागामध्ये संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर "राज्य" या शब्दात भारताचे सरकार व संसद आणि राज्यांपैकी प्रत्येक राज्याचे शासन व विधानमंडळ आणि भारताच्या राज्य्क्षेत्रातील अथवा भारत सरकारच्या नियंत्रणाखालील सर्व स्थानिक किंवा अन्य प्राधिकरणे यांचा समावेश आहे
अनुच्छेद -१३ मुलभूत ह्क्कांशी विसंगत असणारे अथवा त्यांचे न्युनीकरण करणारे कायदे :
संविधानाच्या सुरुवातीला भारताच्या राज्यक्षेत्रात अमलात असणारे सर्व कायदे ते जेथवर या भागाच्या तरतुदींशी विसंगत असतील तेथवर ते अशा विसंगतीच्या व्याप्तीपुर्ते शून्यवत असतील .
*समानतेचा हक्क *
अनुच्छेद १४ -कायद्यापुढे समानता :
राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही .
अनुच्छेद १५-धर्म,वंश,जात,लिंग,किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई :
राज्य कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशाप्रकारे केवळ धर्म,वंश,जात,लिंग,किंवा जन्मस्थान यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करणार नाही .जनतेसाठी नेमून दिलेल्या सार्वजनिक ठिकाणी सर्वाना प्रवेश दिला जाईल .या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे स्त्रिया व बालके यांच्या बाबत विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही .
*टीप -या ठिकाणी राज्य हा शब्द संपूर्ण भारतासाठी वापरण्यात आला आहे .या ठिकाणचा राज्य हा शब्द म्हणजे स्वतंत्र राज्य नसून राज्यंचा बनलेला संघ म्हणजेच संघराज्य असा आहे .भारत हा राज्याने मिळून बनलेला संघ आहे .
अनुच्छेद १६ -सार्वजनिक सेवा योजनांच्या बाबींमध्ये समान संधी -राज्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावरील सेवायोजन किंवा नियुक्ती या संबंधीच्या बाबींमध्ये सर्व नागरिकास समान संधी .
अनुच्छेद -१७ अस्पृश्यता नष्ट करणे :
"अस्पृश्यता "नष्ट करण्यात आली आहे व तिचे कोणत्याही स्वरूपातील आचरण निषिद्ध करण्यात आले आहे ."अस्पृश्य्तेतून" उध्व्णारी नि समर्थता लादणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध असेल .
अनुच्छेद १८ -किताब नष्ट करणे :सेनाविश्य्क किंवा विद्याविश्य्क कोणताही किताब राज्याकडून बहाल केला जाणर नाही .
(१)भारताचा कोणताही नागरिक कोणत्याही परकीय देशाकडून 'किताब स्वीकारणार नाही
(२)भारताची नागरिक नसलेली कोणतीही व्यक्ती ती राज्याच्या नियंत्रणाखालील कोणतेही लाभाचे किंवा विश्वासाचे पद धारण करत असताना राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय कोणत्याही परकीय देशाकडून 'किताब स्वीकारणार नाही.
(३)राज्याच्या नियंत्रणाखालील कोणतेही लाभाचे अथवा विश्वासाचे पद धारण करणारी कोणतेही व्यक्ती राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय परकीय देशाकडून किंवा ,त्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही प्रकारची कोणतीही भेट वित्त लब्धी किंवा पद स्वीकारणार नाही.
Comments
Post a Comment